शेतकरी योजना

ई नाम योजना

धान्य चाळणी यंत्र

बाजार समितीने उपबाजार सुपा एमआयडीसी मध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल अल्प दरात ग्रेडींग करुन देण्याची व्यवस्था तयार केली आहे.

किसान सेवा केंद्र अंतर्गत पेट्रोलपंप

बाजार समितीने उपबाजार भाळवमी येथील जागेमध्ये सन २००८/२००९ या आर्थिक वर्षात दि.१९/३/२००९ रोजी इंडियन ऑयल कागोरशन लि. या कंपनीचा पेट्रोलपंप सुरु केलेला असुन त्याठिकाणी भाळवणी परिसरातील अनेक शेतकरी, वाहन मालक, ट्रक,टेम्पो चालक,भाळवणी व आसपासच्या परीसरातील नागरीक संरथेचा पेट्रोलपंप असल्याने पेट्रोल व डिझेल खरेदी साठी येत असतात. सदर पंपासाठी सुरुवातीला घेतलेले कर्जाची वेळेवर परतफेड करुन सध्या गेल्या अनेक वर्षापासुन पंप भांडवलावर चालु आहे. बाजार समितीने त्याठिकाणी सोलर सिस्टीम बसविण्यात आलेली असुन त्यामाध्यमातुन मोठया प्रमाणात विज बिलाची बचत झालेली आहे. अहवाल वर्षात बाजार समितीने एकुण ४ लाख ६२ हजार लिटर पेट्रोल, ४४ हजार ५५० लिटर पॉवर पेट्रोल, ५ लाख ८२ हजार लिटर डिझेलची विक्री केलेली असुन त्या माध्यामातुन बाजार समितीची रु.१० कोटी ९३ लाख इतकी आर्थिक उलाढाल होवुन ३२ लाख ७० हजार इतका व्यापारी नफा झालेला आहे. तसेच तेथे दैनंदिन भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहारांतुन रु.१ लाख १९ हजार उत्पन्न झालेले आहे.

वजन मापे लायसन्स नुतणीकरण

बाजार समिती संपुर्ण तालुक्यातील वजन मापे दुरुस्तीचे काम करीत आहे. त्यासाठी बाजार समितीने महाराष्ट्र शासनाचे वैध मापनशास्त्र विभागाकडून अधिकृत लायसन काढलेले आहे.